कुबेर ग्रुपविषयी

“कुबेर”परिवारात आपणा सर्वांचे स्वागत…..

मित्रांनो आपण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात चार क्षण सुखात घालवण्यासाठी फेसबुकवर येतो.ते चार क्षण आनंदात, सुख समाधानात जावे एक परिवार,एक कुटूंब म्हणून आपण इथे वावरावे…घरात जसे राहतो ना अगदी तस्सेच….घरात राहतांना आपण शिव्या,अश्लिलभाषा,घाणेरडी भाषा, भांडणतंटे करतो का ? नाही ना मग इथे ही तसेच रहायचे…मतमतांतर असू द्या, तात्विक वाद असतात ही पण ते असतांना कुठेही आपण द्वेषभावना परिवारात ठेवत नाही.
आपण जेष्ठ व्यक्तिंबरोबर बोलतांना त्यांचा आदर ठेऊन बोलावे.महिला वर्गाबरोबर अतिशय सन्मान ठेऊन ,त्यांना योग्य ते संबोधन वापरुन चर्चा करावी. समुहातील महिलेशी गैरवर्तन करणार्या सदस्यास समुहातून काढले जाईल.समुहात सभ्य भाषेतच कमेंट करावी.

● समुहात “राजकिय,धार्मिक द्वेष , जातीद्वेष पोस्ट टाकू नये.

● लेख जर आपला नसेल तर लेखकाचे नाव किंवा कॉपीपेस्ट उल्लेख करावा.

●whatsapp picture ,Good Morning अश्या पोस्ट टाकू नये.टाकल्यास Delete केल्या जातिल.

●कुबेर समुह सोडून दुसर्या कुठल्याही समुहाचे फोटो,त्या समुहा संदर्भात पोस्ट टाकू नये.

●स्वत:चे किंवा कुटूंबातील सदस्यांचे फोटो विनाकारण टाकू नये (विशेष काही असल्यास हरकत नाही )

●”कुबेर”समुहाचा फक्त फेसबुक गृप आहे.whatsapp ,chat group समुहाचा संबंध नाही.समुहातील सदस्याने या नावाने जर समुह बनवला तर त्यास समुहातून नारळ देण्यात येईल.

● महिलावर्गाने आपल्या जबाबदारीवर समुहातील इतर सदस्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारावी.तसेच त्यांच्या चाटिंगचा समुहाशी संबंध असणार नाही.त्या संदर्भात समुहावर पोस्ट टाकू नये.समुहातील सदस्य जर आपणास काहि त्रास देत असेल तर आगोदर तसे कळवावे ,संबंधित व्यक्तिस समुहातून बाहेर केले जाईल.

● समुहात आर्थिक देवघेव आपआपल्या जबाबदारीवर करावी,समुहाचा त्या आर्थिक व्यवहाराशी संबंध असणार नाही.
● समुहात आर्थिक मदतीचे आवाहन करण्यासंबंधीची पोस्ट समुहाच्या Admin बरोबर चर्चा करुनच टाकावी,तसे न केल्यास समुहातून नारळ मिळेल.
★समुहात एक सदस्याने दिवसभरात फक्त तिन पोस्टच कराव्यात.

★सण,उत्सवाच्या माहितीपर पोस्ट टाकाव्यात.

★कुबेर मित्र एकमेकांच्या भेटीचे फोटो टाकू शकतात.

★ 100% whatsapp picture बंद
______________________________________________
तसेच एखाद्या सदस्याला समुहातून बाहेर करण्याचा सर्व अधिकार समुह एडमिनला आहे त्याबाबत खुलासा करण्याची आवश्यक्ता नाही.

अयोग्य वाटलेल्या पोस्ट, कुठलीही चर्चा न करता त्वरित उडवून टाकल्या जातील…
जाता जाता आपण कुबेरचे सदस्य आहोत आणि फेसबुकवर वावरतांना आपण समुहाचे नाव राखावे हि अपेक्षा…
“मी कुबेर आणि तू ही कुबेर ”

धन्यवाद….

FacebookTwitterGoogle+पटल तर शेयर करा...

2014 Powered By Wordpress, Goodnews Theme By Momizat Team